‘इरफान : डायलॉग्ज विथ द विंड’ - दोन कलावंत माणूस म्हणून कसं एकमेकांशी व्यक्तिगत नातं घडवत जातात, याचा सुंदर पट या पुस्तकातून उलगडत जातो
इरफानचं अभिनयातील निर्विवाद कर्तृत्व सर्वांना ज्ञात आहेच, परंतु हे कलावंतपण त्याच्या जगण्यातील छोट्या छोट्या क्षणांतून त्याने कसं जपून ठेवलं होतं, याविषयी अनुप सिंग यांनी फार सुंदर लिहिलं आहे. इरफानची अभिनयातील टोन आणि ऱ्हिदम जपण्याची असोशी, व्यक्तिरेखा समजून घेऊन, त्यांत प्रवेश करण्याचा ध्यास, संगीतातून, त्यातल्या प्रेरणेतून स्वतःमधील अभिनेत्याला तपासण्याची जिद्द, या पुस्तकातून तपशीलवार मांडली आहे.......